Ad will apear here
Next
रयत विज्ञान परिषदेत औंध महाविद्यालयाचे यश


औंध : वाशी (नवी मुंबई) येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये झालेल्या राज्यस्तरीय रयत विज्ञान परिषदेत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रद्युम बावणे या विद्यार्थ्याने तयार केलेल्या ‘एमर्जन्सी अॅलर्ट’ या उपकरणाला तृतीय पारितोषिक मिळाले.

सातारा येथील रयत शिक्षण संस्था आणि डॉ. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने चौथी राज्यस्तरीय रयत विज्ञान परिषद वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज येथे २९ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत झाली. यात एकूण साडेतीन हजार विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील सहा विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. यामध्ये प्रद्युम बावणे, प्रशांत गजभरे, सुनीता चव्हाण, दीक्षा कदम, संभाजी साळुंखे, अर्चना शिंदे या विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित विविध उपकरणे बनविली होती. यामधील प्रद्युम बावणे या विद्यार्थ्याने तयार केलेल्या ‘एमर्जन्सी अॅलर्ट’ या उपकरणासाठी तृतीय पारितोषिक मिळाले. त्याला मिळालेल्या पारितोषिकाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे यांनी त्याचे अभिनंदन केले.



या प्रसंगी बोलताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. बोबडे म्हणाल्या, ‘लहानांपासून मोठ्यांपर्यंत विज्ञानाची गोडी वाढावी तसेच, विद्यार्थ्यांनी विज्ञानातील नवनवीन शोध लावून मोठे संशोधक व्हावे या उद्देशाने रयत शिक्षण संस्थेने ही ‘रयत विज्ञान परिषद’ भरविली होती.’

या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ,  मार्गदर्शक प्रा. मयुर माळी, आविष्कार कमिटीचे चेअरमन प्रा. कुशल पाखले, रिसर्च कमिटीचे चेअरमन डॉ. संजय नगरकर, डॉ. सुहास निंबाळकर, प्रा. एकनाथ झावरे,  प्रा. सुप्रिया पवार, ‘आयक्यूएसी’ चेअरमन डॉ. सविता पाटील, प्रा. नलिनी पाचर्णे, डॉ. हर्षद जाधव, डॉ. अतुल चौरे उपस्थित होते.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZWABW
Similar Posts
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात ‘एनएसएस’चे उद्घाटन औंध : रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालात राष्ट्रीय सेवा योजनेचा (एनएसएस) उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. या प्रसंगी इंदापूर येथील आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
‘रयत शिक्षण संस्थेमुळे जीवनाचे सोने झाले’ औंध : ‘कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाचे सोने झाले. मी ही त्यातील एक विद्यार्थी असून, माझ्यासारखे हजारो विद्यार्थी झोपडपट्टी परिसरातून शिक्षणासाठी येत होते; मात्र त्यांना प्रतिष्ठित महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता. अशा वेळेस डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ औंध : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे, रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष अॅड. राम कांडगे उपस्थित होते.
पुणे विद्यापीठातील सदस्यांची डॉ. आंबेडकर कॉलेजला भेट औंध : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाच्या नवनियुक्त अभ्यास मंडळ सदस्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाला आठ ऑगस्ट रोजी भेट दिली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language